Yugendra Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या एका पत्राने पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या पदांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशातच सुनेत्रा पवार यांच्या या पत्राची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. या पत्रावर आता युगेंद्र पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

















