manoj jarange patil: सोलापूरच्या माढा तालुक्यातील अंजनगावात खेलोबा मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद निर्माण झाला आहे. ओबीसी नेते अंजनगावमध्ये लक्ष्मण हाके हे आंदोलनाला बसले आहेत. यावेळी दोन समाज आमने-सामने येण्याची शक्यता असल्याने मोठा तणाव निर्माण झाला असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
















