आपचे खासदार राघव चड्ढा यांना राज्यसभेच्या उपनेतेपदावरून हटवण्यात आलं आहे. यानंतर खासदार चड्ढा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या पोस्टला कॅप्शन म्हणून ‘इव्हिल आय’ इमोजीसह एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये त्यांनी आजवर राज्यसभेत उपस्थित केलेल्या विविध मुद्द्यांची झलक दाखवण्यात आली आहे. तर आज पुन्हा एकदा राघव चड्ढा यांनी व्हिडीओ पोस्ट करत मी जनतेचे प्रश्न मांडत आहे मग माझा आवाज का दाबला जातोय? असा सवाल पक्षाला केला.















