अकोला जिल्ह्यातल्या बार्शिटाकळी तालूक्यातील कोथळी बुजरूक गावात गेल्या १५ वर्षांपासून वानरांच्या पंगतीची ही परंपरा सुरू आहे. गुरुवारी हनुमान जयंतीनिमित्त सालाबाद प्रमाणे ही अनोखी पंगत पाहायला मिळाली. या गावातील मुंगसाजी महाराज संस्थानच्या वतीनं वानरांना त्यांना आवडणाऱ्या मिष्टान्नाची पंगत देण्यात येते. विशेष म्हणजे माकडंही अगदी शिस्तीत पंगतीत बसतात आणि मिष्टान्नांवर ताव मारतात.














