सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा सध्या शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या स्थापनेमुळे चर्चेत आले आहे. अठरापगड जाती गुण्या गोविंदाने राहत असलेल्या या गावात सध्या तणावाचे वातावरण आहे. कारण मंगळवारी रात्रीच्या वेळीच शिवरायांचा पुतळा खेलोबा मंदिराजवळ स्थापित करण्यात आला. हा पुतळा हटवावा आणि योग्य ठिकाणी बसवावा यासाठी मंदिर समिती आणि एका गटाने मागणी केली, तर पुतळा बसवणाऱ्या गटाने यास नकार दिला. यावरुन गावात तणाव निर्माण झाला आहे, नेमकं काय घडतंय? पाहा

















