सोलापूर जिल्ह्यातील अंजनगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून सुरू असलेल्या वादाला आता राजकीय रंग चढताना दिसत आहे. भाजपा आमदार गोपिचंद पडळकर यांनी या प्रकरणावर भाष्य करत आंदोलकांवर जोरदार टीका केली आहे. रात्रीच्या वेळी पुतळा बसवण्याची गरज काय? असा सवाल उपस्थित करत त्यांनी शिवाजी महाराज आमची अस्मिता असल्याचं स्पष्ट केलं. पुतळ्याला विरोध नसला तरी ज्या ठिकाणी तो उभारला जात आहे, तेथे जातीयवाद आणि राजकारण होत असल्याचा आरोप त्यांनी केला.












