खासगी क्लासचं स्नेहसंमेलन आटोपून घरी निघालेल्या कुटुंबीयांची गाडी शेतातील एका विहिरीत कोसळल्याने नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री दिंडोरी येथे घडली. मृतांमध्ये सहा विद्यार्थी व पालकांचा समावेश आहे. विहीर पाण्याने भरलेली असल्याने बचाव कार्यात अडथळे आले. मात्र क्रेनच्या साहाय्याने रात्री गाडी बाहेर काढण्यात आली.












