राज्यामध्ये साधारण मार्च आणि एप्रिल महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे २९ जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. आंबा, सोयाबीन, फळभाज्या, फळबागा अशा अनेक पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आजच्या आकडेवारीनुसार राज्यात सुमारे २ लाख ४ हजार हेक्टरवर नुकसान झालं आहे. राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री तसंच कृषी व महसूल विभागाच्या माध्यमातून या नुकसानीचे पंचनामे करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच मदत दिली जाईल, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.












