Laxman Hake: केंद्रीय निवडणूक आयोगाने बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर केली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. या जागेवरून महायुतीने अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्याकरता महायुतीकडून प्रयत्न सुरू आहेत. पण आता लक्ष्मण हाके यांनी बारामतीची पोटनिवडणूक ते लढवणार असल्याचं सांगितलं आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती लक्ष्मण हाके यांनी दिली आहे.












