Anjali Damania On Sushma Andhare:अशोक खरात प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एकनाथ शिंदेंवर आरोप केले. “रुपाली चाकणकर यांचे एकूण १७७ कॉल अशोक खरातला झाले आहेत. तसेच त्यांच्या बहिणीचेही २३६ कॉल खरातला झाले आहेत. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तब्बल १७ कॉल्स अशोक खरतला झाले होते.”, असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर “दमानियांना सीडीआरचा कुठून मिळाला?” असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. त्यांच्या प्रश्नाला आता अंजली दमानिया यांनी उत्तर दिलं. त्यांच्या उत्तरावर सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे.












