Devendra Fadnavis On Ashok Kharat Case : नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरण राज्यभर गाजलं आहे. या भोंदू अशोक खरातला बलात्काराच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केलं आहे. सध्या भोंदू खरात कोठडीत असून त्याची एसआयटीद्वारे चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणात दररोज अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. याच अशोक खरात प्रकरणाबाबत आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना मोठं वक्तव्य केलं.











