Sanjay Raut: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी पोटनिवडणूक होत होत असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्याविरोधात उमेदवार जाहीर केला आहे. अशातच आता ठाकरे गट या निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? याकडे आता अनेकांचे लक्ष लागले आहे. यावर आता खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.










