Laxman Hake: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी पोटनिवडणूक होत होत असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न केले जात आहेत. अशातच आता या निवडणुकीतून लक्ष्मण हाके यांनी माघार घेतली आहे. दत्तात्रय भरणे यांनी लक्ष्मण हाके यांची भेट घेऊन त्यांना निवडणुकीतून माघार घेण्याची विनंती केली. त्यानंतर लक्ष्मण हाके यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.











