राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी पोटनिवडणूक होत असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षानं आपण ही निवडणूक लढणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र दुसरीकडे काँग्रेसनं सुनेत्रा पवार यांच्याविरोधात उमेदवार जाहीर केला आहे. यादरम्यान रोहित पवार यांनी एक सोशल मीडिया पोस्ट करत भावनिक आवाहन केलं आहे.








