बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या परराज्यातील भाविकांची लूट होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही भाविकांच्या तक्रारीनुसार दर्शनासाठी रांगेत उभे राहण्याऐवजी व्हीआयपी दर्शन करून देण्याचं आमिष दाखवत दलाल आणि एजंट तब्बल ३,००० रुपये मागत आहेत. “तीन हजार रुपये द्या, थेट दर्शन करून देतो” असे सांगत भाविकांकडून पैसे उकळले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.












