बारामतीतील पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी अजित पवार गटाकडून प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आपण या संकल्पनेच्याच विरोधात असल्याचं ते म्हणाले. बिनविरोध निवडणुकीचा पायंडा लोकशाहीला धरून नाही, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली. यावेळी राहुरी पोटनिवडणुकीवरही त्यांनी भाष्य केलं













