अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध सुरु असताना, यातून आर्थिक विकास करण्याचा प्रयत्न झाल्याचं समोर आलंय. एकीकडे संकट असताना, दुसरीकडे ती संधी असल्याचं हेरून अनेक लोक फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. तसाच प्रयत्न यावेळीही झाला आहे. इराणवर हल्ले होणार याचा पहिला सुगावा अर्थातच संरक्षणमंत्री हेगसेथ यांना लागला. इराणवर हल्ला अटळ असल्याचे लक्षात येताच अमेरिकी संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांच्या स्वीय गुंतवणूक सल्लागाराने युद्धसामग्री उत्पादक कंपन्यांत चाचपणी सुरू केली. अन् ती गुंतवणूक करून आर्थिक फायदा घेतल्याची चर्चा आहे. यासंदर्भात लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी मांडलेलं हे परखड मत.












