राहुरी पोटनिवडणुकीमध्ये भाजपने अक्षय कर्डीले यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे निवडणूक लढवण्याची तयारी करत होते. मात्र अचानक भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री राधाकृष्ण विखे हे प्राजक्त तनपुरेंना भेटले अन् चर्चा झाल्यानंतर काही मुद्द्यावरून तनपुरेंनी माघार घेतली.













