महाराष्ट्रात सध्या पोटनिवडणुकीवरू राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. अशातच ही पोटनिवडणूक होतेये ती राजकारणातील केंद्र स्थान असलेल्या बारामतीत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघाची पोट निवडणूक जाहीर झाली आहे. बारामती आणि पवार हे समीकरण सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होणार अशी चर्चा होती. मात्र यावेळीची स्थिती थोडी वेगळी आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड करण्याची चर्चा सुरू होताच उमेदवारांची संख्या आणखी वाढली आहे. थोडेथोडके नव्हे; तर ५५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, हे उमेदवार आले कोठून? याचीच सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.













