Parth Pawar on Congress: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीकडून हालचाली सुरू आहेत. मात्र, बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे. कारण काँग्रेसने आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे. बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यारुन आता पार्थ पवार यांनी काँग्रेस पक्षावर टीका केली आहे. त्यांच्या टीकेवर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पार्थ पवार यांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेवर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली? हे जाणून घेऊयात











