“तुम्ही विठ्ठल महाराजांना सांभाळता, आम्हाला सांभाळता, हात जोडून विनंती आहे की धनंजय मुंडे साहेबांना सांभाळा, त्यांना मंत्रिपद द्या”, अशी मागणी मुंडे समर्थकाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली. देवेंद्र फडणवीस हे काल श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाच्या ९४व्या नारळी सप्ताहानिमित्त बीडमध्ये होते. त्यावेळी भाषणादरम्यान मुंडे समर्थकाने फडणवीसांडे गावकऱ्यांच्या वतीने ही मागणी केली.












