उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील ‘ठाणे की रीक्षा’ या गाण्यामुळे वादग्रस्त ठरलेल्या स्टॅण्ड अप कॉमेडियन कुणाल कामरा याची विधिमंडळाच्या विशेषाधिकार समितीसमोर साक्ष नोंदविण्यात आली. या साक्षीवेळी कुणाल कामरा यांनी आपण कोणतीही चूक केलेली नसल्याचे ठामपणे सांगितले. हे गाणे हा आपल्या व्यावसायिक क्षेत्राचा भाग असून त्यातून व्यंग मांडण्यात आल्याचे त्याने आपल्या साक्षीत स्पष्ट केले.











