छत्रपती संभाजीनगरमध्ये ९ एप्रिलला करमाड परिसरातील इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर ही धक्कादायक घटना घडली. पूजा गवांडे असं मृत महिलेचं नाव आहे. ती पट्रोल पंपावर काम करत असताना तिचा दुसरा पती सत्यम गवांडे यानं धारदार चाकूने तिच्या गळ्यावर वार करत तिचा निर्घृणपणे हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, पूजाचं यापूर्वी एक लग्न झाल होत आणि तिला एक मुलगा व एक मुलगी आहे. पहिल्या पतीच्या निधनानंतर काही महिन्यांपूर्वी तिन सत्यम गवांडे याच्यासोबत आळंदी येथे विवाह केला होता.













