Asha Bhosle Last Rites: ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं काल (१२ एप्रिल) रोजी निधन झालं. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शनिवारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. आशा भोसले यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. आजीला अखेरचा निरोप देताना नात जनाई भोसले ही भावूक झालेली दिसली.













