अशोक खरात प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या रुपाली चाकणकर यांच्या बहीण प्रतिभा चाकणकर यांची काल शिर्डी पोलिसांनी ८ तास चौकशी केली. समता पतसंस्थेत असलेल्या खात्यांसंदर्भात ही चौकशी झाली असून प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलाचा जबाब नोंदवण्यात आला आहे. अशोक खरातने आर्थिक व्यवहारांसाठी ज्या खात्यांचा वापर केला. त्यातील एक खातं हे प्रतिभा चाकणकरांचं असल्याचं समोर आलं आहे. मात्र चौकशीनंतर प्रतिभा चाकणकर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.













