मुंबईतील वरळी भागातील बीबीडी चाळीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती उत्सवात नागरिक आणि पोलिस यांच्यात थेट सामना झाल्याचं पाहायला मिळालं. डीजे लावण्यास परवानगी नाकारल्याने हा सगळा वाद झाल्याची माहिती आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वरळीत दरवर्षीप्रमाणे १४ ते १६ एप्रिल या कालावधीत वरळी जांबोरी मैदानात जयंती सोहळ्याचे आयोजन केलं जातं. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला डीजे लावू न दिल्याने स्थानिक आक्रमक झाले. यावेळी रहीवाशांनी पोलिसांच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलनही केलं.









