Sahar Shaikh: ठाणे महापालिका निवडणूक विजयानंतर राष्ट्रवादी (शरद पवार ) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना उद्देशून ‘कैसे हराया?’ म्हणणाऱ्या एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांचे नगरसेवक पद धोक्यात आले आहे. बनावट जातीचा दाखला मिळवून शासकीय यंत्रणांची दिशाभूल केल्याचा सहर शेख यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.













