राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज सकाळी बारामती स्पोर्ट्स क्लब परिसरातून जात असताना मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या महिलांनी त्यांना थांबवत मनमोकळा संवाद साधला. यावेळी महिलांनी अजित पवारांनी बारामतीत केलेल्या विकासकामांची आठवण करून देत, “जशी सोन्याची जेजुरी प्रसिद्ध आहे, तशीच बारामती दादांनी घडवली… आणि आम्ही ही बारामती जपणार!” असा ठाम विश्वास व्यक्त केला.











