संसदेत विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाला विरोध केल्यानंतर सत्ताधारी भाजपा नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट शनिवारी रात्री देशाला संबोधित करत काँग्रेसवर हल्लाबोल चढवला. विधेयकाला विरोध करून काँग्रेसने पाप केलं असून त्याची शिक्षा त्यांना नक्की मिळणार, असा इशारा पंतप्रधान मोदींनी दिला.










