नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली एक विषवल्ली, अशी जहरी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. त्यावर आता नवनीत राणा यांनी प्रत्युत्तर देत चिल्लर असा उल्लेख केला आहे. या चिल्लर लोकांवर मला बोलायची गरज नाही. काँग्रेसने हिरवे विषारी साप पोसून ठेवलेले आहेत म्हणून ते वळवळ करतात, असा पलटवार नवनीत राणांनी केला.











