Bhendwal Prediction 2026: साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ (तालुका- जळगाव जामोद) येथील घट मांडणीचे भाकीत आज सोमवारी जाहीर करण्यात आले. चंद्रभान महाराजांचे वंशज सारंगधर महाराज वाघ आणि पुंजाजी महाराज वाघ यांनी विविध क्षेत्राशी संबंधित ही भाकिते जाहीर केली आहे. देशाच्या एकूण स्थिती प्रमाणेच पिकपाण्याची स्थिती देखील फारशी आशादायक नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. शेकडो वर्षाचीपरंपरा असलेल्या घट मांडणीची भाकीत ऐकण्यासाठी आज सोमवारी सकाळी जिल्ह्यासह दुरवरच्या जिल्ह्यातील शेतकरी, ग्रामस्थ, यांची उपस्थिती होती.















