राज्यात सध्या पावसाळी हवामान असून अनेक भागात वादळी वाऱ्यांसह पावसाची नोंद होत आहे. तर काही भागात उष्णतेची लाटसदृश्य स्थिती आहे. पुढील दोन ते तीन दिवस राज्यावर वादळाचा प्रभाव राहणार असून राज्यात मंगळवारी अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर अनेक भागांत यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे. या दरम्यान मेघगर्जनेसह ताशी ३० ते ४० किलोमीटर सोसाट्याचा वारा, गारपीट आणि हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.










