एमआयएमची नगरसेविका सहर शेख यांच्या जात प्रमाणपत्रावरून बरेच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांना अखेर सहर शेखनं आता उत्तर दिलं आहे. निवडणुकीतील पराभव सहन न झाल्याने राजकीय प्रोपोगांडा चालवून आपल्या बदनाम केलं जात असल्याचा आरोप सहर शेखने केला आहे. तर या प्रकरणी कोर्टात जाणार असल्याचंही सहर शेख म्हणाली.









