गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगर पुनर्विकासाच्या आराखड्याच्या सादरीकरणादरम्यान रहिवाशांना धमकविण्याचा प्रयत्न करणाऱ्या म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्याविरोधात अखेर मोतीलाल नगर विकास समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार केली. रहिवाशांसोबत गैरवर्तन करणाऱ्या जयस्वाल यांच्याविरोधात कठोर कारवाई करून त्यांची तातडीने म्हाडातून बदली करण्याची मागणी समितीने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात केली आहे.











