२०२३ ला ज्यावेळी महिला आरक्षणाचा विधेयक पारित करण्यात आलं होतं. त्या विधेयकातच म्हटलं होतं की जनगणना करायची मग डिलिमिटेशन करायचं आणि त्यानंतर हे विधेयक लागू करायचं. त्यावेळी हे सगळे दीड शहाणे गप्प बसले होते, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केली आहे. महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ आयोजित सम्मेलनात ते बोलत होते.













