बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तत्पूर्वी त्यांनी अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केलं. यावेळी मतदानानंतर माध्यमांशी संवाद साधताना अजित पवारांच्या आठवणीत त्या काहीशा भावुक झाल्या.












