हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख यांचा ‘जय शिवाजी’ हा भव्य मराठी चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित होत आहे. यानिमित्त रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांनी भिवंडी तालुक्यातील मराडे पाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठाला भेट देत दर्शन घेतले आणि महाआरतीत सहभागी झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना या शक्तीपीठाचे आणि तेथील कलाकृतींचे कौतुक केले. महाराजांचा संपूर्ण इतिहास येथे प्रभावीपणे मांडण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कोणीही आक्षेपार्ह वक्तव्य केल्यास ते सहन केले जाणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी व्यक्त केली.
















