“छत्रपती शिवाजी महाराज थकले होते आणि त्यांनी राजपाट समर्थांकडे दिला,” या धीरेंद्र शास्त्रींच्या विधानाचा सर्वस्तरातून निषेध होत आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर धीरेंद्र शास्त्री यांनी नागपूरमध्ये रविवारपासून सुरू होणाऱ्या श्री राम कथा कार्यक्रमापूर्वी प्रसार माध्यमांशी संवाद साधत माफी मागितली. काही हिंदू विरोधी शक्तींकडून माझ्या वक्तव्याला चुकीचं दाखवण्यात आलं. तरीही, माझ्या वक्तव्यामुळे कुणी दुखावले असेल तर मी माफी मागतो, असं धीरेंद्र शास्त्री म्हणाले.















