मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी प्रक्रियेसाठी आता केवळ चार दिवस शिल्लक राहिले आहेत. ई केवायसी साठी महिला विकास विभागाने आतापर्यंत तीन वेळा मुदतवाढ दिली आहे. आता ३० एप्रिल ही शेवटची मुदत असणार आहे. राज्यातील २६ लाख ३४ हजार लाडक्या बहीणींनी ई केवायसी केलेली नाही. त्यामुळे २६ लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरण्याची चिन्हं आहेत. मात्र या २६ लाख महिलांनी अद्याप ई केवायसी का केलं नाही, त्याचं कारणही आता समोर आलेलं आहे.















