Heat Wave: महाराष्ट्रात एप्रिल महिन्याच्या अखेरस हवामानात पुन्हा मोठे बदल होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी अवकाळी संकटाचा धोका कमी झाला असला तरी सूर्य आग ओकत असल्याची स्थिती आहे. अशातच २७ एप्रिलसाठी हवामान खात्याने राज्यातील काही ठिकाणांसाठी धोक्याचा अलर्ट जारी केला आहे. विदर्भात उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यातील कोणत्या जिल्ह्यांना उष्णतेचा ‘ऑरेंट अलर्ट’ देण्यात आला आहे? याबाबत जाणून घेऊयात…















