Sanjay Gaikwad | Kolhapur Rada | पुरोगामी संघटना संजय गायकवाड यांच्या विरोधात आक्रमक झाल्या असून कोल्हापूरच्या बिंदू चौकात सरकारविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेचाही निषेध व्यक्त करण्यात आला. प्रशांत आंबी यांना दिलेल्या कथित धमकीप्रकरणी गायकवाड यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलकांनी केली. या प्रकरणात तातडीने कारवाई करून न्याय मिळावा, अशी मागणी संघटनांकडून करण्यात येत आहे.















