अजित पवार यांच्या विमान अपघाताला तीन महिने होत असल्याने तपासाबाबत माहिती घेण्यासाठी आमदरा रोहित पवार हे आज CID ऑफिसमध्ये गेले होते. अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर रोहित पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले. तसंच अशोक खरात प्रकरणाच्या अँगलनेही याचा तपास करावा, असं रोहित पवार म्हणाले.















