सध्या अमराठी टॅक्सी आणि रिक्षा चालकांना केलेल्या मराठी सक्तीचा मुद्दा चर्चेत आहे. अशातच शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टॅक्सी आणि उबरचा एक अनुभव सांगितला आहे. कशाप्रकारे आपण २२ मिनिटं वाट पाहूनही टॅक्सी मिळाली नाही. तर उबर चालकानेही नकार दिला याबाबत सुप्रिया सुळे यांनी फेसबुक लाइव्ह करत माहिती दिली.












