Devendra Fadnavis: मराठी बोलणार नाही, असं म्हणायची कुणाची हिंमत कशी होते? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केल्यानंतर त्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मुंबईतील हुतात्मा चौकात आदरांजली वाहिल्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी भूमिका मांडली.












