आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. अजित पवारांशिवाय बारामतीत होणारी ही पहिली निवडणूक आहे. त्यामुळे बारामतीकर सुनेत्रा पवारांना विक्रमी मतांनी विजयी करतील असा विश्वास महायुतीकडून व्यक्त करण्यात आला. तर मतमोजणीच्या कलांमध्ये सुनेत्रा पवार या सुरुवातीपासूनच विजयी आघाडीवर आहेत. त्यामुळे त्यांचा विजय हा जवळपास निश्चित मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर निकालाच्या
आधीच समर्थकांना उद्देशून सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं पाहू या.













