नसरापूरमधील अत्याचाराची घटना ताजी असतानाच पुण्यात आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. पुण्यातील पर्वती पायथा परिसरात एका ५० वर्षीय व्यक्तीने आपल्याच ९ वर्षांच्या नातीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली
आहे. नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला मात्र हा धक्कादायक प्रकार समोर येताच परिसरात नागरिक आक्रमक झालेत. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आरोपीला जमावाच्या तावडीतून सोडवून ताब्यात घेतल.















