Pune: नसरापूर अत्याचार प्रकरणाची घटना ताजी असतानाच मंगळवारी सायंकाळी पुण्यात एक संतापजनक घटना घडली आहे. एका ९ वर्षाच्या मुलीवर तिच्या सख्ख्या आजोबांनी अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना पुण्यातील पर्वती पायथा परिसरात घडली आहे. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या घटनेनंतर पर्वती पायथा परिसरात तणाव निर्माण झाला.














