Pune News: पुण्यात गेल्या काही दिवसांपासून संतापजनक घटना घडत आहेत. नसरापूर अत्याचार प्रकरणाची घटना ताजी असतानाच मंगळवारी पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका ९ वर्षाच्या मुलीवर तिच्या सख्ख्या आजोबांनी अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना पर्वती पायथा परिसरात घडली आहे. ही घटना समोर आल्यानंतर नागरिकांनी रस्त्यावर उतरुन संताप व्यक्त केला.













