हवामानात झालेल्या बदलांमुळे आता दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुण्यासह काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे हवामान विभागाने पुणे, सातारा आणि कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांना ७ आणि ८ मे रोजी पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. शिवाय मुंबईतही हवामान बदलाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.














