Suvendu Adhikari: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा पराभव करून जायंट किलर ठरलेले भाजपा नेते सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांची हत्या करण्यात आल्याची घटना बुधवारी रात्री मध्यमग्राम या ठिकाणी घडली आहे. या घटनेमुळे पश्चिम बंगालमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेतील आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेवर सुवेंदू अधिकारी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.












